‘शेवट गोड सगळंच गोड..’; ‘NGNR’ मालिकेच्या कलाकारांनी ‘असा’ साजरा केला शूटिंगचा शेवटचा दिवस


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील बऱ्याच जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये ‘लोकमान्य’, ‘यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची’, ‘लवंगी मिरची’, ‘दार उघड बये’ या मालिकांचा समावेश आहे. यांपैकी काही मालिकांच्या जागी नव्या मालिका सुरु झाल्या असून येत्या काळात ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘नवा गडी नवं राज्य’ या दोन मालिका देखील ऑफ एअर जाणार आहेत. यातील ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका येत्या २३ डिसेंबर २०२३ रोजी निरोप घेणार आहे. यापूर्वी मालिकेतील कलाकारांनी शूटिंगचा शेवटचा दिवस एकत्र एन्जॉय केला आहे.

काही दिवसांपूर्वीच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पूर्ण झाले आणि यावेळी मालिकेतील सर्व कलाकारांनी एकत्र हा दिवस साजरा केला. याचा व्हिडीओ मालिकेत सुलक्षणा हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत अभिनेत्री श्रृती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकर देखील दिसत आहेत. ‘नवा गडी नवं राज्य’ हि मालिका त्यांच्या ‘ब्लॅक कॉफी प्रोडक्शन’ची निर्मिती होती. ८ ऑगस्ट २०२२ पासून सुरू झालेली हि मालिका अखेर २३ डिसेंबर २०२३ रोजी ऑफ एअर जाणार आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना वर्षा दांदळे यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘NGNR मालिकेच्या समारोपचा cake आमच्या दोन बाळकलाकारांनी कापला..चिंगी आणि श्रीअंग शेवट गोड सगळंच गोड..’. १० डिसेंबर रोजी मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पार पडले. यावेळी सर्व कलाकारांनी केक कापून शेवटचा दिवस साजरा केला. या मालिकेतून अभिनेत्री पल्लवी पाटील, अनिता दाते- केळकर, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे अशी जबरदस्त स्टारकास्ट आपल्याला पहायला मिळाली.