‘मुलगी पसंत आहे’ मालिकेच्या पहिल्याच प्रोमोने जिंकली प्रेक्षकांनी मन; ‘त्या’ ट्विस्टने वाढवली उत्सुकता


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मालिकांनी वेगवेगळ्या कारणांमुळे प्रेक्षकांचा निरोप घेतला. यातील काही मालिकांचे कथानक पूर्ण झाले, तर काही मालिकांचा टीआरपी कमी असल्यामुळे वाहिनीने बंद करून टाकल्या. अशातच आता काही नव्या मालिकांची मनोरंजन विश्वात भर पडताना दिसत आहे. सन मराठी वाहिनीवरील लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेचे नाव ‘मुलगी पसंत आहे’ असे असून या मालिकेत काही ओळखीचे चेहरे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

सन मराठी वाहिनीवरील लवकरच सुरु होणाऱ्या ‘मुलगी पसंत आहे’ मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेता संग्राम समेळ हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. तर मालिकेच्या मध्यवर्ती भूमिकेत अभिनेत्री कल्याणी टिभे दिसणार आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो अलीकडेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. ज्यामध्ये होणाऱ्या सूनेची ओळख दाखवण्यात आली असून एक अत्यंत लक्षवेधी ट्विस्टदेखील दाखवण्यात आला आहे. ‘मुलगी पसंत आहे’ या नव्या मालिकेत अभिनेत्री कल्याणी टिभे ही सुनेच्या भूमिकेत आहे. पण ती एका उद्देशाच्या या घरात येणार असल्याचे प्रोमोत दाखवले आहे. कल्याणीच्या भूमिकेचे नाव आराध्या आहे.

कल्याणीने यापूर्वीदेखील काही मालिकांमध्ये काम केलं आहे. तर अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेता संग्राम समेळ यांनी ‘पुढचं पाऊल’ या लोकप्रिय मालिकेत एकत्र काम केले होते. सध्या हर्षदा खानविलकर या स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ मालिकेत झळकत आहेत. तर संग्राम संमेलची कलर्स मराठीवरील ‘योगयोगेश्वर जय शंकर’ हि मालिका अलीकडेच कमी टीआरपीमूळे बंद करण्यात आली. यानंतर आता हे तिन्ही कलाकार ‘मुलगी पसंत आहे’ या मालिकेतून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.