Thipkyanchi Rangoli – ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत अक्षय वाघमारेची एंट्री; साकारतोय निगेटिव्ह भूमिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Thipkyanchi Rangoli) स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित आहे. त्यामुळे या मालिकेचा प्रेक्षक वर्ग फार मोठा आहे. अनेक प्रेक्षक न चुकता हि मालिका नित्य नियमाने पाहतात. ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे आणि या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग झाले आहेत. मालिकेतील नवीन ट्वीस्ट आणि नवीन पात्रांची एंट्री ही कायम कथानक रंजक बनवीत असते. अशीच एक नवी एंट्री या मालिकेत झाली आहे.

नुकतीच ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत एका नव्या पात्राची जबरदस्त एंट्री झाली आहे. बिग बॉस मराठी फेम अभिनेता अक्षय वाघमारे या नव्या पात्राच्या माध्यमातून ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) या मालिकेत दिसणार आहे. सध्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत नेत्रा परतल्याने दाखवण्यात आले आहे. नेत्राचं लग्न झालं असून तिचा नवरा तिच्यावर अत्याचार करतो, तिला मारहाण करतो असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खूणा दिसत आहे. दरम्यान नेत्राच्या परत येण्याने अप्पू आणि शशांकमध्ये दूरावा निर्माण झाला आहे.

Thipkyanchi Rangoli

दुखावलेल्या नेत्राला शशांक आधार देत असतो. यावेळी नेत्राला शशांकच्या मिठीत पाहिल्यामुळे अप्पू थेट माहेर गाठते. अशातच अप्पू नेत्राच्या घरी जाते आणि तेव्हा नेत्राचा नवरा तिच्यावर अत्याचार करताना दिसतो. तिचा लॅपटॉप फेकून देतो आणि तिला मारहाण करतो. हे सर्व पाहून अप्पू धक्का बसतो. (Thipkyanchi Rangoli) नेत्राचा नवरा निनाद हे पात्र अभिनेता अक्षय वाघमारे साकारतो आहे. अक्षय त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अशा भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे हि भूमिका त्याच्यासाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. या भूमिकेचा अक्षयच्या अभिनय कारकिर्दीवर काय परिणाम होईल..? चाहते त्याला या भूमिकेत स्वीकारतील का..? असे अनेक प्रश्न तूर्तास निर्माण होत आहेत.