हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत लोकप्रिय वाहिनींच्या यादीत कलर्स मराठी वाहिनीचा देखील समावेश आहे. या वाहिनीवर जवळपास सर्व मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड लाडक्या मालिका आहेत. अशातच ‘सिंधुताई माझी माई’ हि अनाथांची माय अशी ओळख असलेल्या दिवंगत ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारलेली मालिका लवकरच सुरु होत आहे. या मालिकेतील त्वचा महत्वाच्या भूमिका कोण साकारणार हे आता समोर येत आहे. अलीकडेच या मालिकेत किरण माने हे सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारणार हे समोर आले आहे. यानंतर आता सिंधुताईंच्या आईची भूमिका कोण साकारणार हे समोर आले आहे.
‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतून सिंधुताईंच्या बालपणाची गोष्टदेखील प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्यामुळे कथानकाच्या गरजेनुसार काही प्रमुख पात्रांचा मालिकेत समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये सिंधुताईंच्या कुटुंबाचा सहभाग आहे. दरम्यान ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत कोणते कलाकार कोणती भूमिका साकारणार आहे, हे जाहीर झाले आहे. त्यानुसार बालपणीच्या सिंधुताई म्हणजेच चिंधीची भूमिका बालकलाकार अनन्या टेकवडे साकारते आहे. तर सिंधुताईच्या आयुष्यातला बापमाणूस म्हणजेच त्यांचे वडिल भूमिकेत अभिमान साठे यांची भूमिका किरण माने साकारत आहेत. तर सिंधुताईंच्या आईची भूमिका अभिनेत्री योगिनी चौक साकारते आहे.
योगिनी चौक ही मराठी मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय चेहरा आहे. मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून योगिनीने विविध भूमिका साकारल्या आहेत. महाराष्ट्राचा सुपरस्टार कोण..?’ या शोची विजेती योगिनी कला विश्वात विविध माध्यामातून झळकली आहे. याआधी ती ‘तू तिथे मी’, ‘पुढचं पाऊल’, ‘जुळून येती रेशीमगाठी’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. याशिवाय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून देखील ती झळकली होती. मध्यंतरीच्या मोठ्या ब्रेकनंतर आता ती पुन्हा एकदा मालिका विश्वात झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘सिंधुताई माझी माई’ ही मालिका येत्या १५ ऑगस्ट २०२३ पासून संध्याकाळी ७ वाजता ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर प्रसारित होणार आहे.