’36 गुणी जोडी’ मालिकेला लाभली प्रेक्षकांची साथ; वेळ बदलली.. मालिका सुरू राहणार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवरवरील ‘३६ गुणी जोडी’ ही मालिका लवकरच बंद होणार असे बोलले जात होते. सध्या झी मराठीवरील बऱ्याच मालिका कमी टीआरपी मुळे बंद होत आहेत. ज्यामध्ये ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेचा देखील समावेश होता. पण आता मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांना इतका भावला आहे की मेकर्सने ही मालिका सुरू ठेवायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता झी मराठीवरील ‘३६ गुणी जोडी’ ही मालिका नव्या जोमाने आणि नव्या ट्विस्ट सह प्रेक्षकांच्या भेटीला येत राहील. फक्त मालिकेच्या प्रसारणाची वेळ बदलण्यात आली आहे.

झी मराठीची ‘३६ गुणी जोडी’ हि मालिका आज २१ ऑगस्ट २०२३ पासून रात्री ११ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. याआधी ही मालिका संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होत होती. टीआरपी कमी असल्यामुळे ‘३६ गुणी जोडी’ ही मालिका बंद होणार होती. पण मालिकेने शेवटच्या टप्प्यावर जो काही ट्विस्ट घेतला तो प्रेक्षकांना प्रचंड भावला आहे. यामुळे मालिकेची फक्त वेळ बदलली आहे. याबाबत झी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर करून माहिती देण्यात आली आहे.

‘३६ गुणी जोडी’ या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये मालिकेच्या प्रसारणाची वेळ बदलण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून नव्या वेळेत ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेच्या आधीच्या वेळेत आता नवी मालिका सुरू होणार आहे.

‘सारं काही तिच्यासाठी’ असे या मालिकेचे नाव आहे. ही मालिका दोन सख्ख्या बहिणींच्या नात्यावर आधारलेली आहे. यातून खुशबू तावडे, शर्मिष्ठा राऊत आणि अशोक शिंदे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत