‘तुझ्या, माझ्या प्रेमाची गोष्ट…’; तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेचं श्रवणीय टायटल ट्रॅक रिलीज


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने अनेक मालिकांमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. ‘होणार सून मी ह्या घरची’मध्ये जान्हवी तर ‘अगंबाई सासूबाई’मध्ये शुभ्रा अशी तिची लोकप्रिय पात्र आजह प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. यानंतर आता एका नव्या भूमिकेतून तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर ‘प्रेमाची गोष्ट’ ही नवी मालिका सुरु होणार आहे. ज्यामध्ये तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे हे मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका येत्या ४ सप्टेंबर २०२३ पासून संध्याकाळी ८ वाजता स्टार प्रवाह या लोकप्रिय मराठी वाहिनीवर सुरु होत आहे. हिंदी मालिका ‘ये है मोहब्बतें’चा ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका मराठी रिमेक आहे. आतापर्यंत या मालिकेचे प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेचा विषय राहिले आहेत. या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नकारात्मक भूमिकेत असून हि मालिका तरल प्रेमभावना आणि नात्यांवर आधारित आहे. या मालिकेचे शीर्षक गीतदेखील अत्यंत श्रवणीय आहे.

जरी दुरावते जवळ येऊनी
तरी मनास ह्या, आस ही, लागे
खुणावतो तुझा, नवीन स्पर्श हा
उगा उरात ह्या रात ही, जागे
फिरून गुंततो कुणास जीव हा…

ऋतू नवा हवा सुखद आज ह्या
जशी उधाणते हर एक लाट ही
तशीच घेरते ही अबोल प्रीत…
जरा खुलेल ही जरा फुलेल ही
तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट
नकळत उलगडे अशी मनातूनी
तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट…..!!! असे काहीसे या शीर्षक गीताचे बोल आहेत. सध्या हे शीर्षक गीत सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.