‘आठशे खिडक्या नऊशे दारं..’; ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्रीच्या पारंपरिक लूकने वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधून अभिनेत्री गिरीजा प्रभूने प्रेक्षकांच्या घरात आणि त्यांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे. मालिकेचा टीआरपी जितका उत्तम तितकीच गिरीजाची ‘गौरी’ म्हणून तुफान लोकप्रियता आहे. गिरीजा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे विविध लूक शेअर करत ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. नुकतीच गिरिजाने मंगळागौरीच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यासाठी तिने केलेला पारंपरिक लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

श्रावणात मंगळागौरीचे व्रत केले जाते. हे व्रत नवविवाहितेसाठी उत्साह आणि आनंदाची पर्वणी असते. या पवित्र महिन्यात गिरीजानेसुद्धा मंगळागौरीच्या कार्यक्रमाला हजेरी लावत एन्जॉय केलं आहे. मंगळागौरीच्या या खास कार्यक्रमासाठी गिरीजाने केलेला पारंपरिक लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गिरीजाने या कार्यक्रमासाठी हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. सोबत पिवळ्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान केला होता. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने पारंपरिक दागिने परिधान केले होते. गिरीजा या संपूर्ण लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत होती.

अभिनेत्री गिरीजा प्रभूने तिचा हा अत्यंत सुंदर अगदी प्रेमात पाडेल असा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये ‘चला खेळूया मंगळागौर…’ असं लिहिलं आहे. मंगळागौरीच्या कार्यक्रमातील विविध फोटो आणि व्हिडीओ गिरीजाने शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. गिरिजाच्या या लूकवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया देत तिच्या सौंदर्याची तारीफ केली आहे.