मौसम हाय मस्ताना!! उमेश- प्रियाने लुटला पावसात एकत्र भिजण्याचा आनंद; पहा व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय कपल्सपैकी एक म्हणजे अभिनेता उमेश कामत आणि त्याची पत्नी अभिनेत्री प्रिया बापट. हे कपल इतकं गोड आहे कि त्यांचा वेगवेगळा वैयक्तिक जितका चाहता वर्ग आहे त्यापेक्षा जास्त मोठा त्यांच्या जोडीचा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर उमेश आणि प्रिया दोघेही सक्रिय असतात आणि अनेकदा एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना ते विविध पोस्ट शेअर करताना दिसतात. आताही त्यांचा एक क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उमेश प्रिया एकत्र पावसात भिजताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर उमेश आणि प्रिया यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. खरंतर हा व्हिडीओ ‘सावेंची’ नावाच्या’ साडी ब्रँडच्या शूट दरम्यानचा आहे. अभिनेत्री प्रिया बापटची बहिण श्वेता बापट हीच स्वत:चा हा साडीचा ब्रँड आहे. या ब्रॅण्डचं पुण्यात शूटींग ठेवण्यात आलं होतं आणि यावेळी प्रियाबरोबर उमेशदेखील या शूटचा भाग होता. या शुटनंतर दोघांनीही पावसाच्या सरीत एकमेकांसोबत भिजण्याचा, खोड्या काढण्याचा आणि एक गोड क्षण तयार करण्याचा आनंद घेतला आहे. या दरम्यानचा हा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर केला आहे. जो आता व्हायरल होतोय.

या व्हिडीओत प्रियाने निळ्या रंगाची ‘सावेंची’ ब्रॅण्डची साडी परिधान केली आहे. तर उमेशने शर्ट पॅण्ट असा फॉर्मल लूक केला आहे. दोघांचाही हा सिम्पल लूक आणि क्युट अंदाज नेटकऱ्यांना भावला आहे. एका छत्रीत ते दोघे एकमेकांसोबत पावसाचा आनंद घेत आहे. मध्येच लाडूकपणे एकमेकांवर पाणी उडवताना दिसत आहेत. त्यांचा हा गोड पाहून नेटकरी पुन्हा एकदा या जोडप्याच्या प्रेमात पडले आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे, ‘या पृथ्वीतलावरील सर्वात गोड कपल आहे हे’. तर आणखी एकाने लिहिलंय, ‘अरे कित्ती गोड आहात तुम्हीं दोघं, शुभंकरोती सिरियल पासून मी तुमच्या दोघांच्या प्रेमात आहे.. खुप खुप खुप प्रेम!!’