सोनी मराठीवर सुरु होणार नवी मालिका; ‘निवेदिता माझी ताई’चा खोडकर प्रोमो आऊट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांपासून अनेक मालिका ऑफ एअर गेल्या. यातील काही मालिकांची जागा नव्या मालिकांनी घेतली आहे. आतापर्यंत बऱ्याच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या असून अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या आहेत. यामध्ये आता आणखी एका मालिकेचा समावेश झाला आहे. सोनी मराठी वाहिनीवर लवकरच ‘निवेदिता, माझी ताई’ हि मालिका सुरु होते आहे. ज्याचा सुरू नुकताच रिलीज झाला आहे आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कलर्स मराठीची गाजलेली मालिका ‘जीव झाला येडापिसा’मधून प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता अशोक फळदेसाई आणि ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ फेम अभिनेत्री एतशा संझगिरी ही नवकोरी जोडी या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘निवेदिता, माझी ताई’ या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच सोनी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर रिलीज झाला आहे. या मालिकेत भावा- बहिणीच्या अनोख्या नात्याची एक अतिशय सुंदर गोष्ट आपल्याला पहायला मिळणार आहे.

या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेत अशोक फळदेसाई, एतशा संझगिरी यांच्यासोबत बाल कलाकार रुद्रांश चोंदेकरदेखील महत्वपूर्ण भूमिकेत पहायला मिळत आहे. या नव्या मालिकेत अशोक ‘यशोधन’, एतशा ‘निवेदिता’ आणि रुद्रांश ‘असीम’ या भूमिका साकारताना दिसणार आहेत. दरम्यान, अशोक आणि एतशाची प्रमुख भूमिका असलेली ‘निवेदिता, माझी ताई’ ही नवी मालिका कधीपासून सुरू होणार..? हे अद्याप समोर आलेलं नाही.