‘तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता..’; गणेशोत्सवानिमित्त उत्कर्षने शेअर केला प्रल्हाद शिंदेंच्या गायनाचा दुर्मिळ व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज गणेशोत्सवाचा तिसरा दिवस. बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. बाप्पाच्या उत्सवाचे हे १० दिवस अत्यंत उत्साहाचे असतात. कुणाच्या घरी, तर कुणाच्या मंडळात बाप्पा विराजमान झाला आहे. गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र हमखास वाजणारं गाणं म्हणजे ‘तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता’. प्रल्हाद शिंदेंच्या आवाजातील हे गाणं गेल्या पिढ्यांपिढ्या वाजतंय आणि गाजतंय. या गाण्याविषयी आणि गणेशोत्सवाविषयी प्रल्हाद शिंदेंचा नातू अभिनेता, गायक आणि इंटरटेनर उत्कर्ष शिंदेने एक पोस्ट शेअर केली आहे. उत्कर्षने प्रल्हाद शिंदेंच्या ‘तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता’ या गाण्याचा एक दुर्मिळ व्हिडीओ शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.

गायक उत्कर्ष शिंदेने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ”’देवाला आवडणारा आवाज” तूच सुखकरता तूच दुःख हरता.. आज सकाळीच हे गाणं ऐकूण झालं. गणपतीचा माहोल बनवायचा म्हटलं की हे गाणं तर झालंच पाहीजे. कैकदा भेटणारे चाहते ह्या गाण्याच्या आठवणी सांगतात. आमच्‍या लहानपणी आमच्‍या कोकणात घरासमोर झाडांच्‍या बागा अवतीभवती रान घनदाट झाडी आणि मग दूरवर दुसर घर. पण ह्यात सुधा सण आले की सर्वांना एकत्रित करणारा एक आवाज कानी पडायचा. तुच्‍च सुख कर्ता तुच्‍छ दुख हर्ता.., आता तरी देवा मला पावशील का..? ते ऐका सत्यनारायणाची कथ्था.. पिढ्यानपिढ्या जिवंत असलेला हा आवाज आजही यूट्यूब, इन्स्टा रिल्समधून युवा पिढीला भुरळ घालतोय. प्रल्हाद शिंदेंच्या गाठीशी पैसा अवार्ड जरी कमी आला असला तरीही सर्व जाति धर्मातील प्रेक्षकांच प्रेम हे सर्वात जास्त लाभलेले त्यांच्यासारखे बोटावर मोजण्याइतकेच असतील’.

‘ह्या गळ्याने शास्त्रीय बाज जरी जपला नसला तरी वयूंशपरंपरागत गळ्यातून येणारा करेक्ट सूर मात्र त्यांनी सांभाळला होता. मानवी मनाला आध्यात्माकडे खेचून आणणारा हा आवाज. घरातले सासू सुनेचे वाद असो किंवा नात्यांची गंमत सांगणारं गाणं असो. लोकगीतांचे सामने ते रेकॉर्ड ब्रेक करणारी वैविध्यपूर्ण अशी गाणी. त्यांच्याबरोबर काम केलेली मंडळी सांगतात वरच्या पटीत गातांना जिथे इतर गायकांचा श्वास आवाज संपायचा तिथे प्रल्हाद शिंदेंची तान सुरु व्हायची. लहानग्यांपासुन ते वयवृद्धनाही अपलासा वाटणारा हा आवाज. मेळ्यात, चौकात, बाजरात, भजनात, पारायणात, सप्‍ताहात ते घरातील देवघरात जाऊन पोहोचलेला प्रल्हाद शिंदेंचा हा आवाज जो अजरामर होता’.