हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीतविश्वात शिंदेशाही घराण्याचे एक वेगळे स्थान आहे. गायक प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे यांच्या गायकीचे असंख्य चाहते आहेत. आजही त्यांची गाणी वाजली कि लोक ताल धरतात. असा हा शिंदे घराण्याचा संगीत कलेचा वारसा आता पुढील पिढीदेखील तितक्याच ताकदीने चालवते आहे. गायक आदर्श शिंदे हा मराठी तसेच बॉलिवूड संगीत विश्वात विविध ढंगाची गाणी गातो. त्याची अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. तर त्याचा भाऊ उत्कर्ष शिंदे हा एक उत्तम गायक, अभिनेता, संगीतकार, लेखक आणि एंटरटेनर आहे.
उत्कर्ष शिंदे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्यामुळे तो नेहमीच विविध फोटो, व्हिडीओ, आगामी प्रोजेक्ट्सची माहिती आणि फिटनेस संबंधित काही ना काही पोस्ट शेअर करताना दिसतो. आताही त्याने अशीच एक पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. येत्या काळात तो महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटात वीर मावळे सूर्याजी दांडकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी गेल्या काही महिन्यांपासून आपल्या शरीरावर अतोनात मेहनत घेत आहे. दरम्यान अनेकदा उत्कर्ष जिममधील व्हिडीओ शेअर करत असतो.
आताही त्याने असाच जिममधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत उत्कर्षची एनर्जी अगदी पाहण्यासारखी आहे. या व्हिडिओसोबत त्याने लिहिलेलं कॅप्शन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. व्हिडिओसोबत कॅप्शन लिहिताना उत्कर्षने लिहिलंय कि, ‘काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बाळगावी, विचारांवर विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्तुत्वाने ते साध्य करावे’. उत्कर्षच्या या व्हिडिओवर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. त्याच्या या व्हिडिओवर अनेकांनी त्याच्या मेहनतीचे आणि परिश्रमाचे कौतुक केले आहे. सोबतच त्याला यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.