वैभव तत्ववादीच्या क्युट डान्स स्टेप्सने नेटकऱ्यांना पाडलं प्रेमात; व्हिडीओ झाला व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीत वैभव तत्तवादी हा सध्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्यांची उंची, त्याची स्माईल आणि देखणेपणा त्याला इतरांपेक्षा वेगळेपण देते. त्यामुळे वैभवची फॅन फॉलोईंग काही औरच आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर वैभवने आजपर्यंत अनेकप्रकारच्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. चॉकलेट हिरो म्हणून वैभवने साकारलेल्या भूमिकांवर प्रेक्षक इतके भाळले आहेत कि वैभवच्या लिस्टमध्ये तरुणींचा मोठा चाहता वर्ग आहे.

केवळ मराठी नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्येसुद्धा वैभवने एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आहेत. शिवाय वैभव सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. त्यांउळे वेगवेगळे लूक, व्हिडीओ आणि रिल्स शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतो आताही वैभवने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. हि एक व्हिडीओ पोस्ट आहे. ज्यामध्ये वैभवने गायक दर्शन रावल याच्या ‘माहिये जिन्ना सोना’ या गाण्यावर किलर डान्स स्टेप्स करत नेटकऱ्यांवर जादू केली आहे.

माहितीनुसार, सध्या अभिनेता वैभव तत्ववादी हा थंड हवेच्या ठिकाणी सुट्टी एन्जॉय करतो आहे. तर वैभवने आपल्या ट्रीपदरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअऱ केले आहेत. यांपैकी हा एक व्हिडीओ आहे. जो वैभवने त्याच्या स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. रोमँटिक गाण्यावर थिरकताना वैभवने दिलेले हावभाव फारच लक्षवेधी आहेत. जे पाहून कुणीही त्याच्या सहज प्रेमात पडेल. वैभवचा हा क्युट डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.