‘किलर स्माईल.. जबरा स्टाईल..’; वैभव तत्त्ववादीचा डान्स व्हिडीओ व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वैभव तत्ववादी हा मराठी सिनेविश्वातील आघाडीचा अभिनेता आहे. वैभवला जबरदस्त लूक, देखणा चेहरा आणि कमालीची स्माईल दैवी देणगी म्हणून मिळाली आहे. त्यामुळे लाखो तरुणींच्या दिलाची तो धडकन आहे. शिवाय वैभव सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. ज्यामुळे विविध फोटो, व्हिडीओ, आगामी प्रोजेक्ट्सची माहिती तो आवर्जून शेअर करताना दिसतो. त्याच्या प्रत्येक फोटोवर तरुण चाहतींच्या कमेंट्सचा पाऊस पडताना दिसतो. अशातच वैभवने त्याचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. जो तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेता वैभव तत्त्ववादीने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सगळ्यात आधी त्याचा स्टायलिश अंदाज लक्ष वेधून घेतो आणि त्यानंतर त्याचा डान्स. पण नेटकरी घायाळ झालेत ते वैभवच्या एक्सप्रेशन्समुळे. नाचताना त्याच्या चेहऱ्यावरील हवं भाव आणि कमालीचे हास्य अगदी कुणालाही प्रेमात पाडेल असेच आहे. वैभवने या व्हिडिओत ‘हॅपी भाग जायेगी’ या बॉलिवूड चित्रपटातील ‘तेरा आशिक’ या गाण्यावर डान्स केला आहे.

वैभवचा मनसोक्त मोकळा डान्स पाहून नेटकरी देखील खुश झाले आहेत. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर त्याच्या अनेक तरुण महिला फॉलोवर्सने कमेंट केल्या आहेत. अनेकांनी हार्ट ईमोजी, फायर ईमोजी शेअर केले आहेत. तर काहींनी वैभवच्या डान्स आणि एक्सस्प्रेशन्सचे भरभरून कौतुक केले आहे.