हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील हास्यजत्रा हा कार्यक्रम तुफान लोकप्रिय आहे. केवळ देशात नव्हे तर विदेशातही या कार्यक्रमाचे आणि यातील विनोदवीरांचे चाहते आहेत. सध्या हास्यजत्रेचे समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, प्रियदर्शनी इंदलकर, पृथ्वीक प्रताप, गौरव मोरे, वनिता खरात, शिवाली परब हे सगळे अवली कलाकार अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अमेरिकेत लाइव्ह शो करून ही टीम परदेशातील प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसली आहे. परदेशातही मिळालेला हाऊसफुल्ल प्रतिसाद पाहून हे कलाकार भारावले आहेत. वनिता खरातने या खास प्रयोगाची एक झलक ‘नटरंग उभा’ हे गाणे जोडत शेअर केली आहे आणि कॅप्शनमध्ये व्यक्त होत भावुक झाली आहे.
वनिता खरातने हा व्हिडीओ तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ‘टोरंटो तुम्ही खूप प्रेम दिलं! अशा थिएटरमध्ये परफॉर्म करता येणं, ते ही हाऊसफुल्ल शो ला! एका कलाकाराला या पेक्षा मोठी गोष्ट ती काय! अविस्मरणीय प्रयोग. असे क्षण पुन्हा पुन्हा यावेत हिच रंग देवते चरणी प्रार्थना’. इतकेच नवे तर या कॅप्शनमध्ये वनिताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सोनी मराठी वाहिनीचे आभार मानले आहेत.
वनिताच्या या पोस्टवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्य्रक्रमातील इतर कलाकारांनी देखील विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता पृथ्वीक प्रतापने कमेंट करत लिहिले आहे कि, ‘अविस्मरणीय प्रयोग’. तर अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने लिहिले, ‘असा प्रयोग पुन्हा होणार नाही!’. गौरव मोरेने ‘वाह’ अशी प्रतिक्रिया दिली आहे तर नम्रता संभेरावने हार्ट इमोजी शेअर केले आहेत. याशिवाय दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी प्रतिक्रिया देत लिहिले आहे कि, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमचा मला अभिमान आहे’.