MHJ फेम वनिता खरातची ‘या’ मालिकेत खतरनाक एंट्री; साकारतेय महत्वपूर्ण भूमिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून अनेक विनोदी कलाकार प्रकाश झोतात आले. यांपैकी एक आणि प्रेक्षकांची अत्यंत लाडकी अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. परफेक्ट कॉमिक टायमिंगच्या जोरावर वनिताने स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. आतापर्यंत तिने सादर केलेल्या प्रत्येक प्रहसनात तिच्या पदरी आलेली भूमिका गाजली आहे. केवळ महाराष्ट्राची हास्यजत्रा नव्हे तर चित्रपटांमध्येही वनिताने जादू दाखवली आहे. यानंतर आता ती मालिका विश्वातून प्रेक्षकांच्या भेटीस येते आहे.

अभिनेत्री वनिता खरातने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. यांनतर आता वनिता एका लोकप्रिय मालिकेत जबरदस्त भूमिकेत पहायला मिळणार आहे. ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ या मालिकेत वनिता खरातची एंट्री झाली आहे. या मालिकेचा एक नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये वनिता खरात साकारत असलेल्या भूमिकेची झलक पहायला मिळाली आहे. या मालिकेत वनिता एका महत्त्वाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. मुख्य म्हणजे ती साकारत असलेली भूमिका कॉमिक नसून निगेटिव्ह आहे.

त्यामुळे आता प्रेक्षकांना खळखळून हसवणारी वनिता ‘सन मराठी’च्या या लोकप्रिय मालिकेतून एका अनोख्या अंदाजात पहायला मिळणार आहे. व्हायरल प्रोमोमध्ये वनिताचा डॅशिंग अंदाज पहायला मिळतोय. यावरून वनिता एका वेगळ्या जॉनरची भूमिका साकारताना दिसणार आहे. यामुळे वनिताचे चाहते तिला या नव्या आणि अनोख्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. याआधी देखील वनिताने विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र या भूमिकेची बात काही औरच आहे.