‘आमची मुलीकडची पडकी बाजू…’; लग्नाला 6 महिने पूर्ण होताच वनीने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून वनिता खरात घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनात शिरली आहे. तीचं विनोदाचं परफेक्ट टायमिंग नेहमीच सगळ्यांना खळखळून हसवतं. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. वनिताने २ फेब्रुवारी २०२३ रोजी बॉयफ्रेंड सुमित लोंढेबरोबर थाटामाटात लग्न केले आणि या अविस्मरणीय क्षणाला आता बरोबर ६ महिने पूर्ण झाले आहेत. या निमित्त वनिताने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. जो त्यांच्या रिसेप्शन सेरेमनीमधील आहे.

वनिताने तिच्या लग्नातील अत्यंत सुंदर क्षण टिपलेला एक व्हिडीओ अधिकृत सोशल मीडियाचे हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार आणि जोडपी दिसत आहेत. सगळे मिळून वनिता आणि सुमित यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. वनिता खरातने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला हास्यजत्रेतील गौऱ्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. यामध्ये गौरव म्हणतोय, ‘मला बऱ्याच लोकांनी सांगितले तुमची मुलीकडची बाजू आहे..पडकी बाजू आहे… कोण म्हणतंय आमची मुलीकडची बाजू पडकी आहे.. जरा मला सांगा…? असं म्हणतात, नवरा आला वेशीपाशी… पण, आमचं जरा वेगळ आहे. नवरी आली वेशीपाशी… चला सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा वनिता आणि सुमितसाठी..’.

या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रामधील सर्व कलाकार मंडळी वनिताच्या आनंदात सहभागी झाल्याचे दिसत आहे. गौरव मोरे, समीर चौघुले, शिवाली परब, नम्रता संभेराव, रसिका वेंगुर्लेकर, निर्मिती सावंत, प्रियदर्शनी इंदलकर, ओंकार राऊत, पृथ्वीक प्रताप, अंकुर वाढवे, प्राजक्ता माळी यांसह शशिकांत केरकर, निर्मिती सावंत, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे यांसारखे हास्यविश्वातील दिग्गज मंडळी देखील या व्हिडिओत दिसत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा केवळ कार्यक्रम नव्हे तर आता प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला आहे. तसेच हे विनोदवीर प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग. मध्यंतरी हि मंडळी व्हॅकेशनवर असल्यामुळे कार्यक्रम बंद होता. पण येत्या १४ ऑगस्ट २०२३ पासून हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरु होतो आहे.