प्रसिद्ध अभिनेत्रीने दाखवली फार्महाऊसची झलक; Video शेअर करत म्हणाली, ‘देवाच्या दयेने…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सेलिब्रिटी त्यांचं आयुष्य कसं जगतात..? कसे राहतात..? काय खातात..? दैनंदिन आयुष्यात कसे असतात..? याबाबत कायम चाहत्यांना उत्सुकता असते. त्यामुळे हि सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियावर आपल्या राहणीमानाविषयी अपडेट देत असतात. आपले अनुभव, किस्से, कुटुंब, मित्र आवर्जून चाहत्यांसह शेअर करतात. दरम्यान अनेक सेलिब्रिटी मंडळी आपलं घर, फार्महाउस याबद्दल देखील सोशल मीडियावर माहिती देत असतात. अलीकडेच अभिनेत्री ऋतुजा बागवेने नव्या घराबद्दल माहिती दिली. शिवाय प्राजक्ता माळीनेही नाव फार्महाउस घेतलं. यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने आपल्या फार्महाऊसची झलक दाखवली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या शहरातील घराव्यतिरिक्त अन्य ठिकाणी प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. यात आता अभिनेत्री वर्षा दांदळे यांनीदेखील नाशिकमध्ये फार्म हाऊस बांधल्याची आनंदाची बातमी दिली आहे. सोबतच आपल्या फार्म हाऊसची झलक देखील दाखवली आहे. त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या माध्यमातून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या नाशिकजवळ बांधलेल्या फार्म हाऊसची झलक आपल्या चाहत्यांना दाखवली आहे.

या व्हिडिओत अभिनेत्री वर्ष दांदळे म्हणाल्या कि, ‘मी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी या गावी आले आहे. तिथे आम्ही दहा गुंठे जागा विकत घेतली आहे आणि आमचं छोटसं घर बांधलं आहे. मी आणि माझे मिस्टर अधून मधून इथे येत असतो. इथे आम्ही आंब्याची झाडंही लावली आहेत. ती अजून छोटी आहेत. मजा येते अशा निसर्गरम्य वातावरणात राहायला. हे स्वप्न होतं माझं ते आता देवाच्या दयेने पूर्ण झालं आहे’. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘एक बंगला बने न्यारा..’. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.