अवधूत गुप्तेच्या नव्या गाण्यात झळकली ‘बॉईज 3’ची नायिका..; पहा व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीचा ‘सूर नवा ध्यास नवा’ हा सिंगिंग रिऍलिटी शो प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाच्या परीक्षक पदी प्रसिद्ध गायक आणि रॅपर अवधूत गुप्ते आपल्या भेटीस येत असतो. उडत्या चालीच्या भन्नाट गाण्यांसाठी अवधूत कायम चर्चेत असतो. दरम्यान ‘सूर नवा ध्यास नवा’च्या गेल्या सिजनमध्ये अवधूतने प्रत्येक भागातील राजगायक वा गायिकेसोबत गाणं बनवणार अशी घोषणा केली होती. त्यानुसार अलीकडेच त्याच एक नवं गाणं रसिकांच्या भेटीस आलं आहे. ज्याविषयी त्याने सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

‘सूर नवा ध्यास नवा – पर्व सहावे आवाज तरुणाईचा‘मध्ये प्रत्येक भागात होणाऱ्या राजगायक किंवा गायिकेला ओरिजनल गाणे गाण्याची संधी द्यायचे ठरते.. आणि ह्या उपक्रमासाठी आम्ही पाचरण करतो हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये संगीत संयोजनासाठी सुप्रसिद्ध असलेल्या प्रसाद साष्टे यांना! संगीतकार म्हणून प्रसाद हे आमंत्रण मान्य देखील करतात आणि साथ घेतात मराठी चित्रपट सृष्टीतील नामांकित गीतकार मंदार चोळकर यांची.. त्या आठवड्याची राजगायिका ठरते अस्मिता काळे! अस्मिताचं नशीब खरंच फळफळतं आणि तिला मिळतं असं एक नवं कोरं सुमधुर गीत!’

‘आमचा उत्साह अधिक वाढतो आणि आम्ही अभिनेत्री म्हणून आमंत्रण द्यायचं ठरवतो बॉईज – ३ ची हिरॉईन विदुला चौगुले हिला. ती देखील मोठ्या मान्य करते आणि मग जन्माला येतं प्रवासात तुम्हाला आयुष्यभर साथ देणारं एक ट्रॅव्हल सॉंग! रोजच्या धकाधकीच्या जीवनामधून कधीतरी वाटतं क्षणात राजीनामा द्यावा आणि कुठेतरी निघून जावं.. आपल्या आवडीच्या ठिकाणी.. स्वतःबरोबर! अशी कल्पना केली आहे दिग्दर्शिका दुर्गा हिने. गाणं तुम्हाला आवडणार हे नक्की! पण कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये लिहायला आणि मित्रांना फॉरवर्ड करायला विसरू नका. एन्जॉय!!’ सध्या हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत असून रसिकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे.