होय, मी वजनदार!! विशाखा सुभेदारने ट्रोलर्सला सुनावलं; म्हणाली, ‘तुमच्या कमेंट तुमच्यापाशी…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात आपल्या दर्जेदार कॉमेडी अंदाजाने आणि कमाल विनोदाच्या टायमिंगसोबत प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केलेली अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदारकडे पाहिले जाते. विशाखाने कायम विविध भूमिकांच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. विशाखा आणि विनोद हे काही वेगळेच समीकरण आहे. ‘फू बाई फू’, ‘हास्य जत्रा’ अशा कार्यक्रमातून आणि कॉमेडी चित्रपटांमध्ये दर्जा भूमिका साकारत तिने कायम प्रेक्षकांना हसवले आहे. त्यामुळे कॉमेडी विश्वात विशाखाचे वर्चस्व आहे.

विशाखा सुभेदार ही जितकी उत्तम अभिनेत्री आहे तितकीच उत्तम नृत्यांगना आहे. सोशल मीडियावर ती कायम तिचे वेगवेगळे डान्स व्हिडिओ शेयर करत असते. सोशल मीडियावर तिचा बराच चांगला मोठा चाहता वर्ग आहे. पण अनेक नेटकरी मात्र तिला कायम तिच्या वजनावरून ट्रोल करत असतात. अलीकडेच विशाखाने तिचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला होता. या व्हिडिओत ती मराठी गाण्यावर डान्स करताना दिसली. तिच्या चाहत्यांनी या व्हिडिओला विशेष पसंती दिली मात्र काहींनी तिला मुद्दाम ट्रोल केले. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये विशाखाने या ट्रोलर्सची आधीच शाळा घेतली होती.

विशाखाने शेअर केलेल्या व्हिडीओचे कॅप्शन कमालीचे चर्चेत आले आहे. तिने लिहिलंय कि, ‘मी लाडाची…! आत्ता धरती मातेच काय होईल..? भूकंप होईल ह्या सगळ्या कमेंट ठेवा… तुमच्यापाशी..! हो.. आहे वजनदार पण मला पण enjoy करु द्या कीं तुमचं रंजन करत आलेच आहे कीं मी.. मज्जेत राहू द्या आणि तुम्ही पण मज्जेत रहा.!’ असं कॅप्शन देऊन विशाखाने ट्रोलर्सची बोलतीच बंद केली आहे. तिच्या या व्हिडिओला आणि तिच्या कॅप्शनला चाहत्यांनी डोक्यावर उचलून घेत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.