भल्याभल्यांची विकेट घ्यायला येतायत ‘ड्रामा Juniors’; झी मराठीच्या नव्या रिऍलिटी शोची जोरात चर्चा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ हि अत्यंत लोकप्रिय वाहिनी आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षक आवर्जून पाहतात आणि पसंती दर्शवतात. केवळ कार्यक्रम नव्हे तर या वाहिनीवरील रिऍलिटी शो, सिंगिंग शोदेखील तितकेच लोकप्रिय आहेत. अलीकडेच ४ डिसेंबर २०२३ रोजी या वाहिनीवर ‘जाऊ बाई गावात’ हा नवीन रिअ‍ॅलिटी शो सुरू करण्यात आला. ज्याचं सूत्रसंचालन प्रेक्षकांचा लाडका राणा दा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी करतोय. यानंतर आता आणखी एका रिऍलिटी शोची घोषणा करण्यात आली आहे.

अलीकडेच सुरु झालेल्या ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत असताना आता ‘झी मराठी’ने आणखी एका रिऍलिटी शोची भव्य घोषणा केली आहे. ‘झी मराठी’वर सुरू होणाऱ्या या नव्या रिअ‍ॅलिटी शोचे नाव ‘ड्रामा Juniors’ असे आहे. या शोची पहिली झलक नुकतीच झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर करण्यात आली आहे. हा शो टीआरपीच्या रेसमध्ये चांगलाच वरचढ ठरेल अशी चिन्ह आतापासूनच दिसू लागली आहेत.

झी मराठीचा हा नवा शो नेमका कधीपासून..? आणि किती वाजता..? सुरु होणार प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती वाहिनीकडून देण्यात आलेली नाही. ‘ड्रामा Juniors’ या कार्यक्रमासाठी सध्या विविध शहरात लहान मुलांचे ऑडिशन्स सुरु झाले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून छोट्या ड्रामी बाज कलाकारांच्या बहुरंगी अभिनयाची झलक पाहता येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची पहिली झलक समोर आल्यापासून प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच उत्साह पहायला मिळतो आहे.