‘जगण्यासाठी विणलेलं सुंदर स्वप्न…’; ‘सुभेदार’ फेम अभिनेत्रीचा नवं वास्तूत गृहप्रवेश


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसतो आहे. या चित्रपटातून इतिहासातील आणखी एक सुवर्ण पान उघडण्यात आले आहे. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर आधारलेला हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडताना दिसतो आहे. या चित्रपटात अभिनेता अजय पुरकर, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे अशी तगडी स्टारकास्ट आहे. एकीकडे चित्रपटाचे यश आणि दुसरीकडे अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी नव्या वास्तूत गृहप्रवेश केला आहे.

‘सुभेदार’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. दरम्यान सुभेदार सिनेमात तान्हाजी मालुकरेंच्या पत्नीची भुमिका साकारणारी अभिनेत्री स्मिता शेवाळे यांच्या आयुष्यात दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. स्मिता शेवाळे यांनी नवीन घर घेतलं आहे आणि नुकतीच या घराची वास्तुशांत पार पडली. अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी अधिकृत अधिकृत सोशल मिडीया हॅण्डलवर नवीन घरातील गृहप्रवेशाचे व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांना हि आनंदाची बातमी दिली आहे.

या पोस्टमध्ये स्मिता शेवाळे घरात प्रवेश करताना दिसत आहेत. तसेच दुसऱ्या व्हिडिओत होम हवन विधू पार पाडताना दिसत आहे. या व्हिडीओ पोस्टसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘घर म्हणजे केवळ घर नसतं. असल्या जरी चार भिंती. तरी जगण्यासाठी विणलेलं सुंदर स्वप्न असतं…. आपुलकीच्या झुरोक्यातून इथे प्रेमाचं वारं वाहत असतं…’. स्मिता शेवाळे यांच्या पोस्टवर नेटकरी कमेंट करत त्यांना नवीन घरासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.