हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज मंजुळेंच्या ‘फॅन्ड्री’ चित्रपटातील शालू आणि जब्या आजही प्रेक्षकांच्या ध्यानात आणि मनात आहेत. या चित्रपटात शालूची भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात हि सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यामातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. राजेश्वरीने एखादा व्हिडीओ शेअर केला कि तो व्हायरल झाला म्हणून समजाचं. असाच तिचा एक व्हिडीओ मिम्समधून व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर सेलिब्रिटींना फॉलो करणाऱ्या नेटकऱ्यांमध्ये अनेक मेमेकरी असतात. ते कलाकारांचे विविध व्हिडीओ तसेच फोटो वापरून मनोरंजनासाठी काही ना काही मिम्स बनवून प्रयोग करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर शालू आणि जब्याचे २ व्हिडीओ एकत्र करून एक भन्नाट पद्धतीने तयार केलेले मिम जोरदार व्हायरल होत आहे. एका बाजूला शालूच्या बोल्ड अंदाजात मूव्ह्ससोबत ‘IT कंपनीत काम करणारी ती’ असे लिहिलेला एक व्हिडीओ आहे. तर त्याच्यासोबत जोडलेल्या दुसऱ्या व्हिडिओत जब्याचा सालस अंदाज अन त्यासोबत ‘तलाठीचा फॉर्म भरलेला मी’ असे लिहिलेले दिसत आहे. या व्हिडिओसोनट कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘काळी चिमणी गावली पाहिजे लेका’. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.
आम्ही मेमेकर नावाच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर हे व्हिडीओ मीम मनोरंजनाच्या हेतूने शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडीओ अनेक नेटकरी एन्जॉय करत आहेत. तर अनेकांनी तलाठी या पदाचा अपमान करू नये, असा सज्जड दम दिलाय. एका नेटकऱ्याने यावर कमेंट करताना लिहिलंय, ‘दोन मिनिट शांतता त्यांच्यासाठी ज्यांना तलाठी ही पोस्ट किरकोळ वाटते’. तर आणखी एकाने लिहिलं, ‘एक तलाठी अश्या IT वाल्या ५६ खिशात घालून फिरतो’. आणखी एकाने म्हटलंय, ‘अशी पोस्ट टाकून तलाठी पदाबद्दल कमीपणा वाढवू नका. तलाठी हे पद महसूल क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचे आणि पावरफुल पद आहे’. तर आणखी एका युजरने लिहलंय, ‘तलाठी झाल्यावर शाली स्वतः येईल काळी चिमणी घेऊन’.