बाबा घरी नसताना…!! संकर्षण कऱ्हाडेची चिमुकली लेक मारते त्याच्या फोटोशी गप्पा; अभिनेत्याची पोस्ट व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील बहुगुणी अभिनेता, लेखक, सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने स्वबळावर प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. संकर्षणचा स्वतःचा एक मोठा चाहता वर्ग आहे. जो नेहमीच त्याच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतो. उत्तम लिखाण, उत्तम अभिनय आणि कमालीच्या कविता करणारा संकर्षण अनेकांचा लाडका आहे. त्यात संकर्षण सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. ज्यामुळे तो नेहमीच विविध पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतो.

एका कलाकाराचे आयुष्य हे कलेला समर्पित असते आणि यामुळे अनेकदा त्यांना आपल्या कुटुंबाला हवा तसा वेळ देता येत नाही. मुलांचं बालपण अनुभवता येत नाही. अशीच काहीशी व्यथा संकर्षणची देखील आहे. तो नेहमीच कामातून वेळ काढून आपल्या कुटुंबाला देत असतो. पण तरीही कुठेतरी एक छोटीशी सल राहून जातेच. वर्षांपूर्वी तो दोन जुळ्या मुलांचा बाबा झाला. सोशल मीडियावर तो नेहमीच मुलांचे व्हिडीओ शेअर करत प्रेम व्यक्त करत असतो. आताही त्याने लेकीच्या फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे.

संकर्षण नाटक, मालिका, रिऍलिटी शो अशा विविध माध्यमांमध्ये कार्यरत असल्यामुळे अनेकदा शूटिंग किंवा प्रयोगांसाठी दौऱ्यावर असतो. यामुळे त्याचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जातो आणि अशावेळी जेव्हा त्याची दोन्ही मुलं त्याची आठवण काढतात तेव्हा ती काय करतात हे सांगणारा हा फोटो आहे. संकर्षणने त्याच्या लेकीचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती बाबांच्या म्हणजेच संकर्षणच्या फोटोशी गप्पा मारत आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने लिहिलं, ‘बाबा घरी नसतांना बाबाच्या फोटोशी गप्पा..’. त्याची हि पोस्ट पाहून नेटकरी देखील भावनिक झाले आहेत. शिवाय अनेकांनी संकर्षण आणि मुलांमधील हे प्रेम, ओढ अशीच कायम राहो म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत.