World Cup 2023 | आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप फायनलचा सामना अहमदाबादमध्ये चांगला रंगला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांची मॅच आत्ता सुरू आहे. त्यामुळे आजच्या या मॅचचा निकाल नक्की काय लागणार आहे. याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे. अशातच मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने सकाळीच गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्याच्याकडे साकडे घातलेला आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी नेते हिने थेऊरच्या श्री चिंतामणी गणपतीचे दर्शन घेतलेले आहे. त्याचा फोटो शेअर करतील “आजची मॅच जिंकू दे रे देवा,” असे कॅप्शन तिने दिले आहे. एक प्रकारे तिने आजच्या या सामन्यासाठी देवाकडे साकडेच घातलेला आहे या फोटोमध्ये प्राजक्ता ऑफ वाईट साडीमध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे तिने हिरव्या रंगाचा ब्लाउज घातला आहे. आणि प्राजक्ताराचे दागिने देखील परिधान केलेले आहे. तिच्या मागे थेऊरच्या मंदिराच्या चिंतामणीची सुंदर मूर्ती देखील दिसत आहे.
प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. विविध घटनांची माहिती ती सोशल मीडियावर देत असते. गणरायाला घातलेलं तिचं हे साकडं सगळ्यांना खूप आवडले आहे. तसेच सगळे जन तिला कमेंट करून आजची मॅच आपण जिंकणार आहोत असे सांगत आहेत.
हेही वाचा – Amruta Prasad Wedding – शुभलग्न सावधान!! अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे झाले साता जन्माचे सोबती; पहा व्हिडीओ