Yogyogeshwar Jai Shankar – ‘यासाठी मी आजन्म ऋणी…’; शंकर महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता झाला व्यक्त


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Yogyogeshwar Jai Shankar) अलीकडेच कलर्स मराठी वाहिनीवरील अध्यात्मिक मालिका ‘योगयोगेश्वर जय शंकर’ हि मालिका संपली. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र मध्यंतरी मालिकेचा टीआरपी घसरला, प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी झाला आणि त्यामुळे अचानक या मालिकेला निरोप घ्यावा लागला. या मालिकेत शंकर महाराजांची भूमिका अभिनेता संग्राम समेळने उत्तमरित्या पार पाडली होती. तब्बल ९ महिन्यांनी मालिकेचे शूटिंग पूर्ण करून संग्राम आपल्या घरी परतला आणि अत्यंत भावुक मनाने व्यक्त झाला.

अभिनेता संग्राम समेळ याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं कि, ‘…आणि तो अद्भुत प्रवास संपला. या प्रवासात महाराजांनी खूप शिकवलं. एक कलाकार आणि एक माणूस म्हणून. वैयक्तिकरित्या माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होती ही भूमिका करणं. शारिरीक आणि मानासिक सुद्धा. पावलोपावली महाराज परीक्षा घेत होते. (Yogyogeshwar Jai Shankar) पण तरीही मला सांभाळायला माझी आपली माणसं खंबीर होती.

Yogyogeshwar Jai Shankar

मी कधीही घरापासून इतका काळ लांब राहिलो नव्हतो आणि यावेळी सुद्धा बाहेरगावी डेली सोप घ्यायची मनाची तयारी नव्हती. पण ही भूमिका करायला मला माझ्या बायकोने तयार केलं आणि नुसतं तयार केलं नाही तर ९ महिने खंबीर पणे घर सांभाळलं. (Yogyogeshwar Jai Shankar) माझ्या ८६ वर्षाच्या आजीला सांभाळलं. कितीतरी वेळा स्वतःच्या करिअरकडे दुर्लक्ष करून घर सांभाळलं. जेणेकरून मला माझं काम नीट करता यावं’.

‘माझे आई बाबा जे सतत आम्हा दोघांच्या पाठीशी होते, आम्हाला दोघांना कधीही खचू दिलं नाही. मी लांब असण्याची त्यांची तळमळ कधी माझ्यापर्यंत पोहोचू दिली नाही. (Yogyogeshwar Jai Shankar) जेणेकरून मला माझ्या कामात १०० टक्के देता यावेत. माझे आई बाबा म्हणजे माझे पहिले समीक्षक ज्यांनी वेळोवेळी माझं कौतुकही केलं आणि कमी पडलो तिकडे कान पण धरले कारण मला त्यांनीच सगळं शिकवलंय. महाराज आता मोठे होणार आहेत. तू निर्मात्यांना फोन कर… असं सांगणारा माझा मित्र आणि या मालिकेच्या २०० हून अधिक भागांचा संवाद लेखक समीर काळभोर याचे खूप आभार.

(Yogyogeshwar Jai Shankar) माझं नाव सुचवणारा माझा मित्र विजय साबळे याचे आभार. मालिकेचे निर्माते संजय झणकर सर यांनी माझ्यावर दुसऱ्यांदा विश्वास ठेवला आणि मला त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची संधी दिली. सर तुमच्या सारखी गोड माणसं दुर्मिळच. आमची टीम ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आमचे क्रिएटिव्ह प्रवीण चंदनशिवे, अंजली चासकर, युवराज घोरपडे सर, अनुजा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार, ज्यांनी वेळोवेळी माझं मार्गदर्शन केलं’.

‘आमचे लेखक शिरीष लाटकर, पराग कुलकर्णी, समीर काळभोर, आशुतोष पराडकर, शरीर माझं पण आत्मा तुम्ही होता. आमचे उत्तम दिग्दर्शक विठ्ठल डाकवे सर, सचिन गोताड सर, बाबा केंद्रे सर तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं. डिओपी सचिन मेहता ज्यांनी प्रत्येक फ्रेम जिवंत केली. आमची प्रोडक्शन टीम अमित पारकर, सुकुमार डे, अमित, चेतन बिर्ला, किरण, अतिष, सुनील, मेहुल, अविनाश. मेकअप टीम राज वाघमारे, सोनू ज्यांच्यामुळे माझा चेहरा महाराजांसारखा दिसायचा. कॉस्ट्यूम वैदेही वैद्य जिनी माझा लूक उत्तम केला’. (Yogyogeshwar Jai Shankar)

‘आमचे दुसरे निर्माते चिन्मय उदगीरकर, ऋषिकेश उदगीरकर यांचे आभार. एक शो टेक ओव्हर करून तो यशस्वीपणे चालवणं सोपं नव्हतं. (Yogyogeshwar Jai Shankar) चिन्मय तुझ्या नवीन मालिकेची आतुरतेने वाट पाहतोय. कलर्स मराठी या वाहिनीच्या पहिल्या काही मालिकांपैकी एक म्हणजे ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ तेव्हापासून मी कलर्सबरोबर काम करतोय. पण या भूमिकेसाठी मी तुमचा आजन्म ऋणी राहीन. विराज राजे सर, किर्तीकुमार नाईक सर, ऋषिकेश सर मनापासून आभार. आणि तुम्ही मायबाप प्रेक्षक ज्यांनी मला तुमच्या दैवताच्या भूमिकेत स्वीकारलं, प्रेम दिलं, आदर दिला. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. जय शंकर..’.