हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ हि एक अशी मराठी वाहिनी आहे जिच्यावरील मालिका या कायम प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतात. गेल्या काही काळात झी मराठीच्या बऱ्याच मालिकांनी एकामागे एक प्रेक्षकांचे निरोप घेतले. कधी कमी टीआरपी तर कधी कथानक संपल्यामुळे मालिका ऑफ एअर गेल्या. मात्र मनोरंजनात खंड पडू नये म्हणून झी मराठीवर लवकरच नव्या मालिका सुरु होत आहेत. ‘शिवा’, ‘पारु’, ‘जगद्धात्री’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’, ‘नवरी मिळे हिटलरला’ या आगामी मालिकांपैकी आता ‘शिवा’ आणि ‘पारु’चा श्रीगणेशा होणार आहे.
झी मराठीवर येत्या १२ फेब्रुवारी २०२४ पासून ‘पारु’ आणि ‘शिवा’ या दोन नव्या मालिका सुरु होत आहेत. यामधील, ‘पारु’ या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे, अभिनेता प्रसाद जवादे यांच्या मध्यवर्ती भूमिका आहेत. तर मुग्धा कर्णिक, पूर्वा शिंदे, परी तेलंग, अनुज साळुंखे, प्राजक्ता वाडये, विजय पटवर्धन या कलाकारांच्या देखील अत्यंत महत्वाच्या भूमिका आहेत. माहितीनुसार, झी मराठीची ‘पारु’ ही मालिका येत्या १२ फेब्रुवारीपासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
तर, ‘शिवा’ या मालिकेत अभिनेत्री पूर्वा फडके आणि अभिनेता शाल्व किंजवडेकर हे मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहेत. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर आणि अजून बरीच तगडी कलाकार मंडळी महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. माहितीनुसार, हि मालिका १२ फेब्रुवारीपासून रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहेत. दरम्यान, ‘पारु’ आणि ‘शिवा’ या दोन्ही रिमेक मालिका आहेत. ‘पारु’ ही मालिका तेलुगू मालिका ‘मुद्धा मंदारम’चा रिमेक आहे. तर ‘शिवा’ हि मालिका ओडिया मालिका ‘सिंदूरा बिंदी’चा रिमेक असून याचा हिंदी भाषेतही रिमेक झाला आहे. हिंदीत ‘मीत’ असं या मालिकेचं नाव आहे.